सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर हद्दीत वेगवेगळया ठिकाणाहून मोबाईलची चोरी करणाऱ्या आरोपीला सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करुन त्यांच्याकडून ५० मोबाईल फोन एकुण- ५,००,७००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विकास अशोक खंडागळे (वय २९, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
मौजे शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजी नगर सातारा येथे नविन बांधकाम सुरु असले साईटवर असले पत्र्याचे उघड्या शेडममधुन यातील आरोपीत मजकुर याने एकुण १०,०००/- रु.किंमतीचे फिर्यादी व फिर्यादीचा भाचा बिट्ट शेख या दोघांचे मोबाईल चोरी करून नेले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक मांजरे यांनी सातारा शहर पो. ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणने बाबत सुचना दिलेल्या होत्या. परंतु आरोपी हा अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करुन देखील काहीएक माहीती प्राप्त होत नव्हती. अशात गुन्हेप्रकटीकरण पथकास गोपनिय माहीती मिळाली की, शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजी नगर सातारा येथे नविन बांधकाम सुरु असले साईटवरील चोरीस गेलेले मोबाईल हे प्रतापसिंहनगर सातारा येथील एका इसमाने चोरले असल्याचे माहीती प्राप्त झाल्याने सदर इसमास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांनी प्रतापसिंहनगर येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचेअनुशंगाने तपास केला असता सदर इसमाने शिवराज पेट्रोल पंपाचे शेजारी संभाजी नगर सातारा येथे चालु असले बांधकामाचे ठिकाणी असले पत्र्याचे शेडमधुन चोरी केल्याचे सांगुन त्यांचेकडून चोरी केलेल मोबाईल पैकी एक ५,०००/- रुपये किमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे.
सदर आरोपीस अटक करुन तो पोलीस कस्टडी मध्ये असताना त्याचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला. असता सदर आरोपीने आणखी वेगवेगळ्या ठिकाणाहुन मोबाईल चोरी केल्याचे सांगुन चोरी केलेले मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. अशा प्रकारे सातारा शहर पोस्टे हद्दीत वेगवेगळया ठिकाणाहुन आरोपीने चोरी केलेले ५० मोबाईल फोन आरोपी कडून हस्तगत करुन एकुण- ५,००,७००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक श्री अण्णासाहेब मांजरे सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री नानासाहेब कदम, ‘पोहवा. गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, पो.कॉ. गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला आहे.
You must be logged in to post a comment.