अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची बदली

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :  गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सातारा पोलीस दलाचे अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांची महावितरण सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक पदी निवड झाली आहे. तर राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त अजित बोराडे यांची सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या आहेत.

error: Content is protected !!