सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोविड १९ च्या कालखंडात आपल्या मधील प्रत्येक कुटुंबाने मानसिक ताण तणावांचा सामना केला आहे. सध्याच्या कालखंडात वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न म्हणून पुढे येत आहे. आत्महत्या टाळायच्या असतील तर शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र काम केले पाहिजे .एकमेकांच्या मधील सुसंवाद हा या कमी अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले.
परिवर्तन संस्थे मनोबल हेल्पलाईन मार्फत आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंह म्हणाले, वाढते मानसिक ताण आणि आत्महत्या ह्यांच्या बदलत्या जीवनशैलीशी खासकरून सोशल मिडीयाच्या अतिरिक्त वापराशी जवळचा संबंध आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून ते विनाकारण प्रेशर देते, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याची त्यासाठी चे शिक्षण देण्याची गरज आहे ,काही वेळा मुलांना शिक्षणा साठी मोबाइल मिळत नाही म्हणून देखील काही आत्महत्या झाल्या आहेत.
समाजातील कॉलेज मधील युवक/ युवती, घरगुती हिंसाचाराच्या बळी असलेल्या महिला , मुले, वृद्ध स्त्री- पुरुष सर्व घटकांमध्ये संवाद वाढवून काम केले पाहिजे, परदेशी शिक्षण घेत असतानाचे तसेच त्यांचे स्वतःचे अनुभव त्यानी सांगितले. तसेच कोविड कालखंडात परिवर्तन संस्थे मार्फत केल्या गेलेल्या समुपदेशन विषयक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. पुढील वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात डॉ हमीद दाभोलकर म्हणाले कि,समजतील वाढत्या आत्महत्या रोखण्या साठी हेल्पलाईन सोबत समाजातील अनेक मानस मित्र आणि मैत्रिणी यांनी पुढे येणे आवश्यक आहे त्यांचे मोफत आत्महत्या विरोधी प्रशिक्षण परिवर्तन करेल असे देखील त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर परिवर्तन संस्था हि इच्छुक व्यक्तींच्या साठी दर महिन्याला एक प्रमाणे पुढील वर्षभर मोफत आत्महत्या प्रतिबंधक मानस मैत्री प्रशिक्षण घेणार इच्छुक व्यक्तींनी ७४१२०४०३०० या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा असे देखील त्यांनी या वेळी नमूद केले
मनोबल हेल्पलाईनच्या समन्वयक रुपाली भोसले यांनी हेल्पलाईन आलेल्या 400 पेक्षा अधिक कॉल बद्दल माहिती सांगून 18 ते 35 वयोगटात करोना तील आर्थिक संकट, नोकरी व्यवसाय ,स्पर्धा परीक्षा या कारणांमुळे आत्महत्या घडल्याचे नमूद केले. कार्यक्रमात ललित देशमुख, सायली साळुंखे, निलेश एडके यांनी, मनस्विनी लाटकर या मानस मित्रांनी आपले अनुभव कथन केले. या ऑनलाइन कार्यक्रमात जवळपास 100 जणांचा सहभाग होता. राजू इनामदार व योगिनी मगर यांनी सूत्रसंचालन केले. उदय चव्हाण, कृतार्थ शेवंगावकर यांनी आपले मनोगत सादर केले. रेश्मा कचरे यांनी आभार मानले.
You must be logged in to post a comment.