ऑक्सिजन टँकर व सिंलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची अडवणूक नको

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असून कोविड-19 बाधित रुग्णावर उपचार करत असलेल्या सर्व शसकीय व खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने  अध्यक्ष, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शासकीय वा खाजगी रुग्णालयांना पुणे, कोल्हापूर येथील ऑक्सिजन निर्मित करणाऱ्या प्रकल्पांमधून  ऑस्किजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑस्किजन सिलेंडर मधून पुरवठा करण्यात येत आहे. पुण्याहुन येताना राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील खेड शिवापूर व आनेवाडी पथकर नाका व कोल्हापूरहून येताना किणी व तासवडे पथकर नाका येथे पथ्करासाठी वाहने अडवून याचे वजन करणे व इतर कागदपत्रे तपासण यासाठी नाहक अडवणूक करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. वास्तविक प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना कोविड-19  चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत 24X7  या कालावधीत पथकरातून सूट देण्यात आलेली असल्यामुळे पथकर नाक्यावर अन्य कोणत्याही कारणास्तव या वाहनांची अडवणूक करण्यात येवू नये. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरुन ऑक्सिजन टँकर, हॉस्पिटलमधील छोटे-मोठे ऑक्सिजन सिंलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन राखीव ठेवावी अथवा सुरु असलेल्या लेनमधून ही वाहने तात्काळ सोडण्याची कार्यवाही करावी. ऑक्सिजन टँकर, जी वाहने ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणार आहेत त्यांना तात्काळ सोडणे आवश्यक असल्याने त्या वाहनांची अन्य होणत्याही करणास्तव अडवणूक करण्यात येवू नये.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधित पथकर नाक्याचे व्यवस्थापक, मूळ ठेकेदान यांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच  भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

error: Content is protected !!