सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खाण पट्टा मिळावा मागण्यासाठी कराड वडार समाजाच्या वतीने शुक्रवारी कराड तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला.
खाणपट्टा देण्यास प्रशासन विलंब करत असल्याने हा गाढव मोर्चा काढण्यात आल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला रोजगार नाही. त्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आधी सुचनेनुसार, नांदलापूर, केस पाडळी इथे खाण पट्टा देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.