कराड, भूमिशिल्प वृत्तसेवा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर कोल्हापूरकडे निघालेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात मनाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश काढण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलिसांनी सातारा ते कराड यादरम्यान रेल्वे प्रवासात या आदेशाची प्रत किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर आपण कायदा पाळतो असे सांगत मी कोल्हापूरला नक्की पुन्हा येणार असे सांगत किरीट सोमय्या सकाळी सव्वादहाच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात कराडमधून मुंबईकडे रवाना झाले.
You must be logged in to post a comment.