सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराची तहान भागवत असलेले कास तलाव गेल्या महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले आहे. पश्चिम भागात अधूनमधून पाऊस पडत असल्याने पाणी अजूनही सांडव्यावरुन वाहत आहे. सातारा नगरपालिकेच्यावतीने आज तलावातील पाणीसाठ्याचा ओटीभरण कार्यक्रम पार पडला.
यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हदगे, स्नेहा नलवडे, राजू भोसले, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक यांच्यासह नगरसेवक व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माधवी कदम म्हणाल्या, कास धरणाची उंची वाढणे हा सातारा नगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात हे काम पुर्ण होईल व सातारकरांना मुबलक पाणी मिळेल.
सिता हदगे म्हणाल्या, गेल्या वर्षी चांगला पाऊस पडल्याने उन्हाळ्यातही नगरपालिकेला पाणी कपात करावी लागली नाही. यंदाही पहिल्याच पाऊसात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने याही वर्षी सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध होईल.
You must be logged in to post a comment.