कोरोना काळात जिल्ह्यात १ लाख १९ हजार केसेस

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागाकडून सर्वोतोपरी उपायायोजना करण्यात येत आहेत. तसेच ब्रेक द चेन व त्यानंतर लॉकडाऊन नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या वेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर एकूण १ लाख १३ हजार ६०१ केसेस व ३,१०,०१,९००/- दंड अशी कारवाई करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे विनामास्क फिरणारे नागरीकांवर एकूण ३०१०९ केसेस करुन ८१,४७,६०० दंड वसुल करण्यात आलेला आहे. मोटार वाहन कायदयाप्रमाणे ७९,५२९ केसेस करुन १,९२,०३,४०० दंड वसुल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेशानुसार विनाकारण फिरणारे व ई पास चे उल्लंघन करणा-या नागरीकांवर २९५९ केसेस व १९,२०,८०० दंड वसुल करण्यात आलेला आहे. लग्न समारंभ/मंगल कार्यालय या ठिकाणी गर्दी जमवलेबाबत २५ केसेस १,९४,००० दंड वसुल करण्यात आलेला आहे.

दुकाने/शॉपौंग मॉल/यांनी ‘लॉकडाऊन आदेशाचे उल्लघंन केले बद्दल ९०२ केसेस व ८,०६,१०० दंड वसुल केला आहे. खाजगी प्रवासी वाहतुक व लक्झरी बसेस यांनी विनापास प्रवासी घेतले बद्दल व इतर नियमांचा भंग केले वरुन ‘७७ केसेस ७,३०,००० दंड वसुल केलेला आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लघंन करुन विनाकारण फिरणारांचे वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ४४०९ दुचाकी व २३९ चारचाकी वाहने जप्त/ताब्यात घेण्यात आलेली आहेत. याचबरोबर होमकॉरंन्टाईन नियम न पाळणे, वाहन निर्धारीत पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक, र्वजनिक ठिकाणी थुंकने, दुकानामध्ये सामाजिक अंतर न पाळणे सोशल डिस्टींग न पाळणे , दारु तंबाखू चे सार्वजनिक ठिकाणी सेवन करणे अशा व वर नमुद कारवाई मध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेच्या काळात एकूण १,१३,६०१ केसेस व ३,१०,०१,९०० दंड अशी कारवाई करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर सर्वाधिक कोविड बाधित असलेली (टॉप टेन) गावे व सर्वात कमी कोविड बाधित असलेल्या (बॉटम टेन) गावांवर विशेष लक्ष ठेवून विशेष उपायोजना राबविण्यात येत आहेत. जेणे करुन जास्त कोविड बाधित असणारे गावातील रुग्ण संख्या कमी होईल व कमी रुग्ण संख्या असेलेल्या गावांत रुग्ण संख्या वाढणार नाही या अनुषगांने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशा गावांमधील जास्तीत जास्त नागरीकांनी होम आसोलेनशन संस्थात्मक विलगीकरणात राहून काटेकोर नियम पाळतील याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्थानिक प्रशासनासोबत गांव पातळीवर सरंपच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे सहकार्याने बॅरेकेटींग सह इतर करण्यात येत आहेत.

error: Content is protected !!