सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सर्वोच्च न्यायालयाचे 30 जून 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे.
त्यानुसार सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता पुढील प्रमाणे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, सातारा पिन-415001 असा आहे. संपर्क क्रमांक 02162-232349, टोल फ्री क्र.1077 व ई-मेल rdcsatara@gmail.com.
सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी, सातारा आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपद्धती लवकरच अधिसुचित करण्यात येईल.
You must be logged in to post a comment.