कोल्हापूर महापालिका निवडणूक निरीक्षकपदी रणजितसिंह देशमुख

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निरीक्षकपदी हरणाई सहकारी सुतगिरणीचे संस्थापक व खटाव-माणचे काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. महापालिकेत एकूण 82 प्रभाग असून सर्व माहिती संकलित करण्याची प्रक्रिया देशमुख यांनी सुरू केली आहे.                 

रणजितसिंह देशमुख यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाच्या वतीने त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपविल्या आहेत. माण-खटावच नव्हे तर सातारा जिल्ह्यात त्यांच्या काँग्रेसच्या प्रवेशामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यस्तरीय निवडणूक समितीचे महाराष्ट्र राज्य काँग्रेस सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीतही पक्षाने त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली होती. ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्याने पक्षाने त्यांना सद्या कोल्हापूर महापालिकेचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. या महापालीकेत एकूण 82 प्रभाग आहेत.या निवडणूकीत जास्तीत जास्त जागा निवडूण आणून महापालीकेवर निर्विवादपणे पक्षाचा झेंडा फडकविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

या नियुक्तीबद्दल त्यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, मंत्री विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आदिंसह मान्यवरांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!