सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शांततेस बाधा निर्माण होणारी कृत्ये होत असल्याने शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गुंड पिल्या उर्फ विजय राजू नलवडे याला जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया पिल्या उर्फ विजय नलवडे (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरोधात एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तयार केला. त्यानंतर पोलीस अधिकाºयांच्या मार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला.दरोडा, जबरी चोरी, खंडणी, बेकायदेशिर जमाव जमविणे, दुखापत, गंंभीर दुखापत, धाक दाखविणे, घरी जाऊन मारहाण करणे आदी प्रकारचे गुन्हे पिल्याने केले आहेत. त्यामुळे त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होणारी कृत्ये होत असल्याने व धोकादायक व्यक्ती झाल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पिल्या नलवडेला स्थानबध्द करण्याचा आदेश काढला. त्यानुसार १९ आॅगस्टपासून पिल्याला सातारा जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.