चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः चक्रीवादळामुळे झालेल्या पावसात वाई, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. मोठ्या प्रमाणावर घरांचे, शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी आ . मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, प्रांताधिकारी संगीता चौगुले राजपुरकर, तहसीलदार सुषमा पाटील , गटविकास अधिकारी नारायण घोलप, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, उपअभियंता सचिन बाचल तसेच, मश्वर पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, नारायण बिरामणे, सपोनि सतिश पवार, शेखर कासुर्डे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित  कदम उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब पाटील यांनी नुकसानीची माहीती घेऊन  शहरातील वीज पुरवठा  दोन दिवसात व ग्रामीण भागातील वीज पुरवठा पुढील 3  दिवसात सुरळीत करण्याचे सूचना दिल्या. मश्वर तालुक्याच्या दुर्गम भागात वारंवार वीज जात असल्याचे तसेच तापोळा कांदाटी खोऱ्यात लो व्होल्टेज मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती राजेंद्र राजपुरे यांनी दिली. अनेक गावांत लो व्होल्टेज मुळे ग्रामपंचायतिच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना चालविताना अडचणी यरत असल्याची पुष्टीदेखील राजपुरे यांनी जोडली. याबाबत चर्चा करताना आ.मकरंद पाटील यांनी कुंभरोशी येथे सबस्टेशन उभारण्याबाबतची चर्चा केली. दरम्यान, ना.पाटील यांनी महसूल,नगरपालिका,सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तेचे झालेल्या नुकसानाची प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

पाचगणी, महाबळेश्वर ही दोन शहरे व त्या शहरांच्या दरम्यानच्या गावांमध्ये अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासाठी प्रस्ताव द्या त्यासाठी मी व आ .पाटील प्रयत्न करून ,सातत्याने वीज जाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिले.रविवारी  झालेल्या चक्रीवादळाने पाचगणी व परिसरात पावसाबरोबर ,वादळी वाऱ्याने  अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला . मोठ्या प्रमाणावर घरांचे,शेतीचे नुकसान झाले  याची माहिती घेण्यासाठी  ना.पाटील पाचगणीत आले होते.
 
कुणाचीही तक्रार येऊ नये.अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे अशी अपेक्षा देखील ना.पाटील यांनी व्यक्त केली.स्ट्राबेरी हे या तालुक्यातील मुख्य पीक असून यावर्षी सुमारे 10 लाख रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी भरला आहे.मागील वर्षी मश्वर तालुक्यातील सुमारे 100 पॉली हाऊस चे नुकसान वादळी पावसाने झाले होते.याचे रीतसर पंचनामे।होऊन नुकसानभरपाईसाठी विमा कंपन्यांकडे प्रस्ताव दाखल।करून देखील कुणालाच याचा लाभ झाला नाही.कालच्या वादळी पावसाने ८-१० पॉली हाऊसचे नुकसान झाले आहे.मात्र यावर्षी तरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न राजुशेठ राजपुरे यांनी उपस्थित केला.यावर ना पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी ना.पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र,तलाठी कार्यालय,श्रीनिवास बोधे या ठिकाणच्या नुकसानाचीही पाहणी केली.

error: Content is protected !!