जावलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीकडून पैशांचे आमिष

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आज पीडित कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचं आमिष देऊन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुळकर, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर या सहा जणांवर अतिसंवेदनशील गुन्ह्याची तक्रार दाखल नाकारण्यास, तसेच 25 हजाराचे आमिष दाखवून पीडित कुटुंबीयांना धमकावणे, अशा गुन्ह्याखाली या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीस दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेण्यात आले असून बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65, रा. नेवेकरवाडी ता. जावळी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आणखीन यामध्ये सहा आरोपींचा समावेश झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीदेखील आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला देखील समज देखील देण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी नराधम आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला व हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत पंचवीस हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला, या प्रकरणी सहा जणांविरोधात मेढा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेढा पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक 6 गाव पुढाऱ्यांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात हे प्रकरण मिटवण्यासाठी आले होते. ते सर्व राजकीय प्रतिष्ठीत गाव पुढारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पीडिताच्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या या सहा गाव पुढाऱ्यांना मेढा पोलिसांनी अद्दल घडवली.

जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!