सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटिसी संदर्भात बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी रविवारी महत्वाची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने जो जरंडेश्वर कारखान्याला जो कर्जपुरवठा केला आहे. तो एकदम सुरक्षित आहे. रिझर्व्ह बँक नाबार्ड यांच्या नियमानुसारच कर्ज पुरवठा केला असून ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसून बँकेने जो कारखान्याला कर्ज पुरवठा केला असेल तर त्याची माहिती द्यावी, अशी मागणी ईडीने केली असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.
You must be logged in to post a comment.