सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

1 फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण 95.15 टक्के इतका आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट महामार्गांवरील वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधू कडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यावर कारवाई करावी.
राज्यासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 100 टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही तरी ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे.

मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
You must be logged in to post a comment.