सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आसू (ता.फलटण )येथे एका तरुणाचा गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) व्हायरसमूळे मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातच एकच खळबळ उङाली आहे. यापूर्वी या युवकाला कोरोना झाला होता.
आसू ता.फलटण येथील शिवराज स्वामीनाथ साबळे (वय १८) याला सुमारे एक महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. त्याचा एचआरसीटी स्कॕन फक्त २ होता. या आजारातून तो पुर्णपणे बरा झाला होता. बरे झाल्यानंतर माञ दोन दिवसांनी त्याला अशक्तपणा येऊन प्रकृती खालावत चालली होती. त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जीबीएस व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले होते. माञ आज उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे असणारे अनेक रुग्ण आढळले आहेत. योग्य औषधोपचाराने हा रोग काबूत येत असला तरी खर्चिक उपचारामुळे रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस येत आहेत.
You must be logged in to post a comment.