ट्रॅप लागल्याची शंका आल्याने वनपाल लाचेची रक्कम फेकून ठोकली धूम

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वन विभागाकडून माती बंधाऱ्यांच्या कामाचा चेक देण्यासाठी दहिवडीच्या वनपालाने ठेकेदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता ती रक्कम स्विकारल्यानंतर ट्राॅप लावल्याची संशय आल्याने वनपालाने पैसे फेकून धूम ठेकली. दरम्यान, वनपाल सुर्यकांत यादवराव पोळ (वय- ५७ रा.मार्डी ता.माण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पोट ठेकेदार म्हणुन कामकाज करत असुन त्यांनी संस्थेच्या नावे मौजे शिंदे खु.क.नं.८८४ माती बंधाऱ्याचे काम केले होते. या केलेल्या कामाचे बिलाचा चेक देण्यासाठी वनपाल सुर्यकांत यादवराव पोळ याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने याबाबत सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक,अशोक शिर्के, संजय साळूंखे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी सापळा रचला. तक्रारदार यांनी वनपाल पोळ यांना दहा हजार रुपये दिले. दरम्यान, पोळ याला आपल्यावर लाचलुचपतचा ट्रॅप लावला असल्याचा संशय आल्याने त्यांनी स्विकारलेली लाचेची रक्कम फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!