सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुनवर्सनचा दाखला देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी तासगाव (ता. सातारा.) येथील मंडलाधिकारी संतोष झनकर (रा. गुरुवार पेठ, सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी रंगेहात पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांना पुनवर्सनाचा दाखला हवा होता. त्यासाठी मंडलाधिकारी संतोष झनकर यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज सांयकाळी शकुनी गणेश मंदिर परिसरात सापळा लावला. यावेळी मंडलाधिकारी झनकर यांनी दहा हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.