सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, मात्र घाबरुन त्यांचा मृत्यु ह्दय विकाराने झाला आहे. अशा जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंप वीज कनेक्शन प्रलंबीत आहे, अशा प्रलंबीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर विज कनेक्शन द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
जिल्हा अग्रणी बॅकेने तयार केलेल्या 9 हजार 275 कोटीच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गाकयावाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.