सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आमची लढाई ही विचारांची आहे. कोणत्याही व्यक्तींच्या विरोधात नसून भाजप या पक्षाविरोधात आहे. संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत परळी खोरे हे राष्ट्रवादीमय करणार आहे. हे काम करीत असताना कोणी दबाव आणला तर तो उलटून टाकू असा निर्धार आ.शशिकांत शिंदे यांनी केला.
सातारा तालुक्यातील भोंदवडे येथे शशिकांत वाईकर यांच्या सह शेकडो युवा कार्यकर्त्याच्या राष्ट्रवादी प्रवेश युवा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्या प्रसंगी केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जि.प.सदस्य दिपक पवार, शशिकांत वाईकर उपस्थित होते .
शिंदे पुढे म्हणाले, परळी खोऱ्यात घराघरात राष्ट्रवादी वाढवायची आहे .जर कोणी त्रास देत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. स्व. भाऊ साहेब महाराजांन पासून माझे राजघराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर आहे.
दिपक पवार म्हणाले, ही पन्नास वर्षे एकाच घरात सत्ता आहे. परळी भागातील माणसांनी बाहेर आले पहिले .परळी खोऱ्याचे मुक्तेहार पत्र लिहून घेतले कि काय .
यावेळी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. शशिकांत वाईकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत शेकडो युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.
You must be logged in to post a comment.