गांजाची शेती करणाऱ्यांना अटक

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या धावडे गावात गांजाची शेती केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली पाटण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धावडे येथील किसन यादव, ज्योतीराम सुर्वे आणि रामचंद्र यादव या तिघांच्या शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा धाड टाकली. यावेळी शेतीमध्ये लागवड केलेल्या गांजाची झाडे निदर्शनास आली. पोलिसांनी कारवाईत १३ किलो १३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

error: Content is protected !!