नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तत्काळ करावेत : शेखर सिंह

महाबळेश्वर, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अतिवृष्टीमुळे झालेल्या भागांतील नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून तत्काळ निधीची तरतुद केली जाणार आहे. यासाठी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे अधिकारी यांनी तातडीने करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

मागील आठवडयात अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात मोठया प्रमाणावर नुकसान झाले याचा आढावा घेण्यासाठी आ मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी शेखरसिह यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर तालुका आपत्ती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीसाठी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मेहश गोंजारी , तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
     

error: Content is protected !!