जेव्हा जयंत पाटील हट्ट धरतात…

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पण सध्या भाजपवासी असलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेली जवळीक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादीचा कोणताही नेता साताऱ्यात येऊदे अगदी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. काल शुक्रवारी साताऱ्यात आलेल्या जयंतराव पाटील यांच्या स्वागतादरम्यान ‘मला शिवेंद्रराजेंच्या हस्तेच बुके पाहिजे, असा आग्रह धरलेला किस्सा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील एका खासगी कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्यालयात भेट दिली. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख व बॅंकेचे संचालक उपस्थित होते.

जयंत पाटील यांच्या स्वागता दरम्यान, पाटील यांनी मी बुके फक्त राजेंच्या हस्ते घेणार असा हट्ट केला. त्यावेळी रामराजेंकडे बुके देण्यात आला. तेव्हा पाटील म्हणाले, मला शिवेंद्रराजेंच्या हस्तेच बुके पाहिजे, असे सांगितले. दरम्यान, पुन्हा रामराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांनी बुके देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांना नकार देऊन एकट्या शिवेंद्रराजेंच्या हस्ते बुके पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी त्यांना बुके दिल्यानंतर तो जयंत पाटील यांना स्विकारला.

या स्वागतादरम्यान, झालेला किस्सा सध्या समाज माध्यमांवर चांगला व्हायरल होत आहे. दरम्यान,या दौऱ्यात माण बाजार समितीच्या निवडणुकीचा जयंत पाटील यांना आढावा घेतला. तसेच माण तालुक्यातील राजकारणावरही चर्चा झाली. माण मतदारसंघातील मधील सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमदार व्हायचे असल्याने तेथे पाडापाडीचे राजकारण सुरु आहे. ते रामराजे यांनी लक्ष घालून थांबवावे, अशा सूचना पाटील यांना केल्या.

error: Content is protected !!