प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीतर्फे जोडेमारो

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस सातारा जिल्हा यांच्या वतीने विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’ आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव स्मिता देशमुख, जिल्हाध्यक्ष पूजा काळे, जिल्हा उपाध्यक्ष प्राची कांबळे, वाई तालुका अध्यक्ष दामिनी चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष कोमल घोरपडे व इतर युवती उपस्थित होत्या.

प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका केलेली आहे. प्रवीण दरेकरांच्या अशा बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुरुष, पदाधिकारी कार्यकर्ते यांचाच अपमान नसून संपूर्ण महिलांचा अपमान सुद्धा आहे. प्रवीण दरेकर यांनी केलेला बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो अशा मानसिकतेला चोप बसण्यासाठी दरेकर यांवर कार्यवाही व्हावी म्हणून त यांच्या प्रतिमेला तोंडाला काळे फासण्यात आले.

error: Content is protected !!