प्रशासकाकडून शाहूपुरीच्या विकासावर परिणाम नको : शाहूपुरी विकास आघाडीची मागणी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा नगरपालिकेच्या हद्दीवाढीत शाहूपुरीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात आले असून प्रशासक काम पाहत आहेत. प्रशासकांनी शाहूपुरीमधील दैंनदिन सेवासुविधा देत असताना शाहूपुरीकरांवर अन्याय करून नये, अशी मागणी शाहूपुरी विकास आघाडीच्यावतीने सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शाहूपुरी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना मंजूर झालेली विकास कामे तसेच तांत्रिकदृष्टया अपूर्ण राहिलेल्या कामांना तातडीने मंजूरी देऊन ही कामे सुरु करावीत. मोळाचा ओढा परिसरात पाईपलाईन फुटल्याने हे पाणी परिसरातील लोकांच्या घऱात शिरत आहे. ती पाईपलाईन दुरुस्त करावी. अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नियमित घंटागाडी येत नाही. या प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा कोंडे, निलम देशमुख, माधवी शेटे व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!