फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे निधन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांचे शुक्रवार दिनांक 27 रोजी लेह लडाख येथे आकस्मिक निधन झाले.

नंदकुमार भोईटे हे फलटण शहरात राजे गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. ते सलग 35 वर्ष नगरपरिषदेत निवडून जात असून त्यांनी आपल्या वाँडासह शहर विकासाच्या अनेक संकल्पना यशस्वी राबविल्या. कोरोना काळात रुग्णांना बेड आणि इतर वैद्यकिय सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने सजाई गार्डन येथे सुरू केलेली कोरोना केअर सेंटर सुरु केले होते. त्यांच्या निधनामुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!