सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – फलटण शहरातील आखरीरास्ता कुरेशीनगर येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तल खाण्यावर फलटण शहर पोलीसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 650 किलो जनावरांचे मास , 40 जर्शी गाईची वासरे व वाहने जप्त केली.
याबाबत माहिती अशी की, आखरी रस्ता कुरेशी नगर फलटण येथे दि. 11 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास जाकीर कुरेशी यांच्या घरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वाजिद जाकीर कुरेशी , इलाही हुसेन कुरेशी , गौस रहीम कुरेशी , तोसिफ अनिस कुरेशी , अरबाज नियाज कुरेशी ( सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण )हे अवैधरित्या जनावरांची कत्तल करीत असताना मिळून आले. तसेच 40 वासरे टेम्पो गाडीत भरलेल्या स्थितीत मिळून आली. दरम्यान, तोसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी यांनी तेथून पळ काढला. या कारवाईत 650 किलो जनावरांचे मास , 40 लहान जर्शी गाईची वासरे एक टाटा कंपनीचा 407 टेम्पो क्रमांक (एम एच 20 एफ 6768), पांढरी रंगाची इनोवा कार क्रमांक (एम एच 01 व्ही 9860), इलेक्ट्रॉनिक वजन काटा , दोन मोबाईल हँडसेट असे एकूण 32 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
You must be logged in to post a comment.