सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सातारा जिल्ह्यातही सरासरी तिनशे रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहे. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने यात्रा, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली असताना वाई तालुक्यातील बावधन ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवून बगाड यात्रेचे आयोजन केले. या यात्रेत हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला आहे.
You must be logged in to post a comment.