बॅंकेतील लाॅकरवर विश्वास नसल्याने घरात ठेवलेले सोनं चोरट्यांनी केले लंपास

फलटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फलटण तालुक्यातील कोळकी येथील सेवानिवृत्त असलेल्या एका शिक्षिकेचा बॅंकेतील लाॅकरवर विश्वास नव्हता म्हणून घरातच ६१ तोले सोनं ठेवले होते. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घरफोडी करून सर्व ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

 याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहरानजीक कोळकी गावच्या हद्दीतील शारदानगर येथील कस्तुरा सीताराम माळी (वय ६३) या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांच्या घरामध्ये त्या आणि त्यांची बहीण राहात आहे. दोन दिवसांपूर्वी घराला कुलूप लावून त्या बाहेरगावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकऊन घरात प्रवेश केला  घरातील कपाटात ठेवलेले त्यांचे व त्यांची बहीण शकुंतला यांचे ६१ तोळे सहा ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे सर्व दागिने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत तब्बल १४ लाख रुपये होती. दरम्यान, शनिवारी सकाळी त्या घरी आल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक

भरत किंद्रे यांनी घटनास`थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने पाहणी केली. तसेच सातारहून श्वानपथक मागविण्यात आले होते. फलटण शहर पोलीस स्टेशनचा मोठा पोलीस फौजफाटा तपासाच्या दृष्टीने विविध ठिकाणी शोध घेत आहे. या घटनेची फिर्याद कस्तुरा माळी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ हे करीत आहेत.

error: Content is protected !!