सातारा, (भूमिशिल्प वृत्तेसवा) : सध्या लोणंद परिसरात बर्ड फ्लू मुळे लोणंद शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 14 रोजी मरीआईचीवाडी, तालुका खंडाळा येथील शिंदे वस्ती व कापरे वस्ती येथील सुमारे सत्तर ते ऐंशी कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. या मृत कोंबड्यांचे नमुने पुणे व त्यानंतर भोपाळ येथील केंद्रीय विषाणू जन्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सकारात्मक आला असून या मृत कोंबड्यांच्या मृत्यु बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, लोणंद शहरात व शहराच्या आसपास असणारी सर्व चिकन व अंड्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून लोणंदमध्ये दर गुरुवारी भरणारा कोंबड्यांचा आठवडा बाजारही या अणिर्नीत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरीआईचीवाडी ता. खंडाळा येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथील मृत पावलेल्या कोंबड्यांचा परिसरात सोडियम हायफोक्लोराइडची फवारणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी ही 10 किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रातील सर्व परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर लोणंद नगर पंचायतीच्या वतीने लोणंद शहरात व शहराच्या आसपास असणारी सर्व चिकन व अंड्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून लोणंदमध्ये दर गुरुवारी भरणारा कोंबड्यांचा आठवडा बाजारही या अणिर्नीत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. १६ रोजी कापडगाव, तालुका फलटण येथील वसंत ठोंबरे यांच्याकडील तीस ते पस्तीस कोंबडया मृत पावल्या असून त्याचाही तपास करण्याचे काम चालू आहे.
You must be logged in to post a comment.