सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर शिवसागर पॉईंट नजीक दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गणेश उतेकर व ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही दरड हटवून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
महाबळेश्वर – तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर शहरापासून अठरा किमी अंतरावर वेळापूर गावाच्या हद्दीमध्ये शिवसागर पॉईंटच्या नजीक मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मोठमोठे दगड, माती मुख्य रस्त्यावरच आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ही माहिती गणेश उतेकर यांनी बांधकाम विभागास कळविली बांधकाम विभागास या ठिकाणी पोहोचण्यासाठी काही काळ लागणार होता. मात्र दरड कोसळल्याने मुख्य रस्ताच बंद झाल्याने अनेकांना अडचण निर्माण होत होती. गणेश उतेकर यांनी राजू उतेकर, पांडुरंग कदम, दीपक जाधव आदींच्या सहकार्याने दगड व माती हटवून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
You must be logged in to post a comment.