मिरवणुकीत गुलाल उधळल्याप्रकरणी मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. भाजी मंडई गणेश उत्सव मंडळाच्या मंडईचा राजाच्या भक्तांनी वाजत-गाजत गुलालाची उधळत करत गणपतीची मिरवणूक काढली.मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने गणेश मंडळा विरूध्द गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या गणेश मंडळा विरूध्द गुन्हा दाखल झाला असून, मंडळातील २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महेश पागडे, अमोल हादगे, शंभूराज साळुंखे, किरण साळुंखे, ईश्वर साळुंखे, रोहित शिंदे, पराग निवळे यांच्यासह एकूण २२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मंडल अधिकारी जयंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.संबंधित बातम्या

error: Content is protected !!