रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने मंगळवार तळे परिसरात रस्ता रोको करण्यात आला.

सातारा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत. अनेकांनी आपल्या बंगल्याच्या भिंती रस्त्यावर बांधल्या आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी पालिकेने अतिक्रमणे काढावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकानी निदर्शने केली.

error: Content is protected !!