राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांची निधन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

भिलार, ता. महाबळेश्र्वर येथील बाळासाहेब भिलारे यांची ओळख दुर्गम भागातील लोकांच्या प्रश्नासाठी लढणारा नेता म्हणून आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या काम करीत असताना विविध विकास कामे दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी काम केले. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदावर काम केले असून सध्या ते प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत होते. पुस्तकाचं गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या भिलारला जगाच्या नकाशावर पोहोचल्यावर पोहोचवणे मध्ये बाळासाहेब भिलारे यांचे मोठे योगदान होते.

बाळासाहेब भिलारे मागील काही दिवसांपासून आजारी होते. या अल्पशा आजारामुळे आज त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

error: Content is protected !!