जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 556 च्या घरात
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात (सोमवारी) दिवसभरात एकूण 40 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 556 झाली आहे. दरम्यान, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा रांजणी (ता. जावली) येथील 85 वर्षीय मृत्यू झालेल्या महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या 22 झाली आहे.
दरम्यान, मुंबईवरून आलेली व घरीच क्वारंटाईन असेलली बोपेगाव (ता. वाई) येथील रक्तदाबाचा त्रास असलेली 85 वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला आणि 15 वर्षांपूर्वी कॅन्सरने आजारी असलेला व 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचेही मृत्यूपश्चात घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांचा तालुका व गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
सातारा (02) : कुसबुद्रुक-19 व 23 वर्षीय पुरुष. फलटण (02) : बरड- 55 वर्षीय महिला, वडाळे- 35 वर्षीय पुरुष. जावली (05) : आंबेघर- 59 वर्षीय पुरुष, रांजणी- 85 वर्षीय महिला (मृत्यू), कावडी- 52 वर्षीय महिला, कळकोशी- 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी)- 39 वर्षीय महिला. कराड (06) : वानरवाडी- 19 व 9 वर्षीय पुरुष, 70 व 7 वर्षीय महिला, विंग- 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण. पाटण (05) : जांभेकरवाडी- 22 वर्षीय महिला, काळेवाडी- 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी- 25 व 22 वर्षीय पुरुष, नवसरवाडी- 60 वर्षीय पुरुष. खंडाळा (05) : शिरवळ- 72 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, पिंपरी- 58, 28, 70 वर्षीय महिला. खटाव (03) : अंभेरी- 3 व 6 वर्षीय बालिका, 29 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर (08) : हरचंदी- 53 वर्षीय महिला, कासवंड- 62, 39, 12 वर्षीय महिला, 63 व 36 वर्षीय पुरुष, गोरोशी- 72 वर्षीय महिला, कोट्रोशी- 10 वर्षीय मुलगी. वाई (04) : दह्याटवाडी- 45 वर्षीय पुरुष, वोव्हाळी- 42 वर्षीय पुरुष, जांभळी- 11 वर्षीय मुलगी, वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेविका, असे 40 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
मृत्यूपश्चात 5 जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’
महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड येथील 57 वर्षीय पुरुष, पाथरवाडी (ता. कराड) येथील 33 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ (सातारा) येथील 65 वर्षीय महिला, अंबेदरे आसरे (ता. वाई) येथील 43 वर्षीय महिला तसेच उंब्रज (ता. कराड) येथील 60 वर्षीय पुरुष या 5 जणांचा मृत्यूपश्चात घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
237 जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
रात्री उशिरा एनसीसीएस (पुणे) यांनी 228 जणांचे तर कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांनी 9 जणांचे असे एकूण 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे.
233 जणांचे नमुने तपासणीसाठी
सातार्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे 31, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 52, कराडच्या कृष्णा कॉलेज येथील 42, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 14, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 6, खंडाळा ग्रामीण रुग्णालयातील 29, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 33 व रायगाव कोरोना केअर सेंटर येथील 26 अशा एकूण 233 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.