सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील वडुथ, पुसेगाव, क्षेत्र माहुली आणि अंगापूर वंदन या ठिकाणी सर्व सुविधा असेलेले कोव्हीड सेंटर जिल्हाधिकारी शेखऱ सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तातडीने मंजूर केले.दरम्यान, आ. शशीकांत शिंदे यांनी प्रयत्न केल्यामुळेच या परिसरात सेंटर उभे राहत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या समवेत बैठक घेतली. या सर्व सेंटरला पूर्वीच मान्यता घेतली होती. या कोव्हीड सेंटरसाठी १० लाख रुपये आमदार फंडातून दिले आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त ५० लाख रुपये निधी मंजूर व्हावा यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतले . येत्या सात दिवसात प्रत्येकी ३० बेड्सचे हे कोव्हीड सेंटर सुरू करण्यात येईल. कोव्हीड सेंटर मध्ये लागणाऱ्या इतर आरोग्य सुविधा,औषधे, यंत्रणा उभी करण्यात आमदार म्हणून मी कोठेही कमी पडणार नाही व सातारा जम्बो हॉस्पिटल प्रमाणे इथेही सर्व सुविधा उपलब्ध होतील.असे यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.सदर बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, सतीश चव्हाण, पं. स. सदस्य संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.
पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने कोव्हीड सेंटर सुरू करण्यात यासाठी तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्यात आले. बाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातारा तसेच नवी मुंबई येथे रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देणे, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळवून देणे यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण त्याला आता मर्यादा येऊ लागल्या आहेत, या सर्व यंत्रणा कमी पडत आहेत त्यामुळे नागरिकांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
You must be logged in to post a comment.