सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून शासन निर्देशाप्रमाणे वीर धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरु करणार आहे असे प्रतिपादन सातारा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी किर्ती नलावडे यांनी केले.
सातारा येथील पुर्नवसन उपजिल्हाधिकारी किर्ती नलावडे यांचे कार्यालयात वीर धरणग्रस्त पुर्नवसन संघर्ष समितीचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांचे बरोबर झालेल्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी किर्ती नलावडे म्हणाल्या, धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करत हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संकलन सुची पुणे येथील पुर्नवसन विभागाकडे असल्याकारणाने त्यां कार्यालयाकडुन मागितली जाईल व ती प्राप्त होताच धरणग्रस्तांची प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.
यावेळी वीर धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत वेगवेगळ्या मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी दिलेले भुखंड, गावठान नकाशा, निर्वाह भत्ता, त्याचप्रमाणे पर्यायी जमीन खंडाळा तालुक्यात देणेसाठी तसेच विविध मागण्याबाबत चर्चा झाली.
या बैठकीसाठी निरा उजवा कालवा प्रकल्पाचे आधिकारी विजय नलावडे धरणामधील जलाशयाची पाणी पातळी वेळोवेळी निश्चित विषयी वरिष्ठ आधिकारी यांना अवगत करुन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले.या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसिलदार विवेक जाधव, समितीचे वतीने समन्वयक डॉ. विजय शिंदे ,अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, जयवंत चव्हाण,गणेश जाधव,विश्वास चव्हाण,विजय चव्हाण,विशाल गायकवाड,मधुकर कदम यांनी सहभाग घेतला.
यावेळी तहसिलदार विवेक जाधव,समन्वयक डॉ.विजय शिंदे अध्यक्ष देवानंद चव्हाण सचिव अजिंक्य चव्हाण, भोळी सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच महेश चव्हाण, भादे उपसरपंच विशाल गायकवाड,हरिश्चंन्द्र लिमण, विश्वास चव्हाण,जयवंत चव्हाण,गणेश भोसले,भास्कर कदम व प्रकल्पग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.