सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भुयारी गटार योजनेमुळे सातारा शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठेकेदाराकडून रस्त्यांचे कामात हलगर्जीपणा करण्यात असल्याचे निदर्शनास आणून देऊन सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ठेकेदारांची चांगलीच कानउघाडणी केली.
सातारा शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. भुयारी गटारचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने खड्डे मुजवणे गरजेचे आहे. नागरिकांकडून पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी उत्तर देत असताना ठेकेदाराची चांगलीच भंबेरी उडाली. गणेशोत्सव पूर्वी शहरातील सर्व खड्डे मुजले पाहिजे, असा सूचना कदम व शेंडे यांनी दिल्या.
You must be logged in to post a comment.