सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिरवळ ता.खंडाळा येथे गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हॉटेलची व गाड्यांची तोडफोड करीत तब्बल अडीच ते तीन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी अंदाजे ६५ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दखल करण्यात आल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून तणावाची परिस्थिती निवळण्यासाठी शिरवळमध्ये मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातील वाई,लोणंद,शिरवळ,खंडाळा,फलटण ग्रामीण,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग(एलसीबी)सह दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आल्याने तणावाची परिस्थिती निवळली.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, मंगळवार दि.२० सप्टेंबर रोजी गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून शिरवळ येथील शरद ताटे,निलेश तळेकर,राजू गुंजवटे,राहुल हाडकेप्रशांत रेवडीकर,शुभम गुंजवटे,बबलू तळेकर हे जमावाने येत शिवीगाळ करीत हॉटेलच्या काचेवर दगड मारून फोडत होते. यावेळी हॉटेलचे आलम लतीफ शेख याने संबंधितांना विचारणा केली असता संबंधितांनी दमदाटी करीत असताना आणखी ७ ते ८ जण दुचाकीवरून त्याठिकाणी आले असता त्यांनीही शिवीगाळ व दमदाटी करीत राहुल हाडके याने शिवीगाळ करीत पोलीस स्टेशनला तक्रार केल्यास कोणालाच सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान, या हल्ल्यामध्ये काचांचे व फ्रिज असे दोन ते अडीच लाखांचे हॉटेलचे नुकसान झाले आहे. त्याप्रमाणे संबंधितांनी मुन्नाभाई उर्फ रमजान शेख याच्या मालकीची कारची काच फोडत नुकसान करीत शिरवळ येथील थिएटरवर जात त्याठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या गाडीच्या काचा गोंधळ घालून शिवीगाळ,दमदाटी करीत नुकसान केले आहे. याप्रकरणी आलम शेख याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून शरद ताटे,निलेश तळेकर,राजू गुंजवटे,राहुल हाडके,प्रशांत रेवडीकर,शुभम गुंजवटे,बबलू तळेकर असे अंदाजे ६५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार हे करीत आहे
You must be logged in to post a comment.