सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्जाचे एक लाख दहा हजार कोटीपर्यंत पोहोचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल तर इडीची चौकशी लावली जाते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
वडूज, ता. खटाव येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषि राज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हास पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, गुलाबरआदी उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.