सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मनसेच्या मेळाव्यात सदस्य नोंदणी सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आजपासून साताऱ्यात मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.
साताऱ्यात आज जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला. या नोंदणीसाठी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. यावरुन मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक होणार असल्याचं दिसून येत आहे.
युवराज पवार म्हणाले, राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक आयोगानुसार दर तीन- चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यास सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सातारा शहर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहेत .
You must be logged in to post a comment.