सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहिवडी शहरामध्ये सलग तीन दिवसाचा लाॕकडाऊन पाळण्यात आला आज मुदत संपताच पुन्हा १० दिवसाचा लाॕकडाऊन वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दहिवडी शहरामध्ये कोरोनाचे संकट गडदच होत आहे तीन दिवसात २३रुग्ण सापडले आहेत त्या मुळे ही साखळी तोडणे खूप जिकीरीचे झाले आहे दहिवडी येथील बचतभवन मध्ये आज पुन्हा आढावा घेण्यात आला प्रांतअधिकारी शैलेश सुर्यवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख, दहिवडीचे मुख्याधिकारी अवधुत कुंभार, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष सौ.निलम शिंदे, सर्व नगरसेवक दहिवडी वैद्यकीय विभागाचे डाॕ हेमंत जगदाळे उपस्थित होते.
या वेळी दहिवडी शहराकडे गांभीर्याने घ्यावे आज जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेशंट दहिवडी शहरात सापडत आहेत जानेवारीपासून १०५ कोरोना रुग्ण आढळले आसून ७१ जण उपचार घेत आहेत रोज हा आकडा वाढतच चालला आहे त्या मुळे आणखी लाॕकडाऊन वाढवावा, अशी मागणी होऊ लागली त्यानंतर सर्व व्यापारी याःना विश्वासात घेऊन लाॕकडाऊन आणखी १० दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्या मुळे अत्यावश्यक सेवा वगळता आठवडी बाजारासह सर्व व्यवहार बंदच रहाणार आहेत तसेच विनामास्क फिरणारे लोक असतील त्यांच्याकडून दंड वसूल करुन कडक कारवाई केली जाणार आहे दहिवडीतील जे हाॕटस्पाॕट असतील ते शील करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
You must be logged in to post a comment.