नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा दुकानदारांवर गुन्हे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर व परिसरात निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने सुरू ठेवणाऱ्या दहा दुकानदारांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शाहू चौकातील हॉटेल ऋतु अमृततुल्य हे वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु होते. याप्रकरणी प्रमोद भोसले (रा.एमआयडीसी) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच देगाव फाटा येथील सहेली कलेक्शन दुकानही उशीरा सुरु होते. याप्रकरणी शाहरुख शेख, ईर्शाद मोमीन, एस.व्ही. माने (रा.देगाव फाटा) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

देगाव फाटा येथील सरस्वती वस्त्र निकेतन हे दुकान उशीरापर्यंत सुरू होते. दत्ता खामकर, भगवान काशिद (रा.देगाव फाटा) यांच्याविरुध्द शहर गुन्हा दाखल झाला आहे.देगाव फाटा येथील एमजे चिकन सेंटर उशीरा सुरु ठेवल्याप्रकरणी नसिम कुरेशी व चायनीज सेंटर सुरु ठेवल्याप्रकरणी इम्रान शेख (देगाव रोड) यांच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!