सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कारी, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत घरासह शेजारील पोल्ट्री शेड जळून खाक झाले. यात सुमारे १०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.
कारी येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय-45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3.00 च्या दरम्यान अचानक आग लागली. यात घरातील दस्ताऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा जळाले. तसेच घराशेजारील गवताच्या गंजीने पेट घेतला. दरम्यान, घरालगतच असलेल्या पोल्ट्री शेडमधील १०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी धावाधाव केली. यात विलास भातुसे स्वतः जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. डोळय़ासमोर घर पेटते पाहुण भातुसे कुटुंबांना अश्रू अनावर झाले.
You must be logged in to post a comment.