राजवाड्यावरील भित्तीशिल्प उद्घाटनप्रकरणी ११ जण ताब्यात

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील राजवाडा बसस्थानकावर उभारलेल्या भित्तीशिल्पाचे उद्घाटन केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रतापगड उत्सव समितीचे मिलींद एकबोटे, भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह जवळपास ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजवाडा बसस्थानकाच्या आवारात भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे. या भित्तीशिल्पावर काहींनी आक्षेप घेतला आहे. असे असतानाच सोमवारी सायंकाळच्या सुमारास या भित्तीशिल्पाचे उद्घाटन करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यानंतर प्रतापगड उत्सव समितीचे मिलींद एकबोटे, भाजप नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह जवळपास ११ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.दरम्यान, मिलिंद एकबोटे व विजय काटवटेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच भाजप तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात आले. यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, प्रवीण शहाणे, संतोष प्रभुणे, अॅड. प्रशांत खामकर, सतीश ओतारी, विक्रम बोराटे, अतुल शालगर, कुणाल मोरे, जयदीप ठुसे आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!