सातारा,(अजित जगताप): श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या खासगी पाठशाळेच्या स्वरूपात सन १८२० मध्ये सातारा येथे स्थापन झालेल्या प्रतापसिंह हायस्कूलला २०३ वर्षे पूर्ण झालेले आहेत. आनंदाची बाब म्हणजे पूर्वी या शाळेचे नाव सातारा एलिमेंटरी स्कूल त्यानंतर जुनी शाळा त्यानंतर सातारा एग्रीकल्चर स्कूल गोरमेंट हायस्कूल अशी नाव दिली असली तरी खऱ्या अर्थाने शाळेचे संस्थापक श्रीमंत छत्रपती प्रताप महाराज थोरले यांच्या नावाने ही शाळा गाजत आहे. याचं कारण म्हणजे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पालक यांनी दिनांक ७ नोव्हेंबर १९०० रोजी इयत्ता पहिली मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळा प्रवेश दिला आणि हाच ऐतिहासिक दिवस सध्या जगभर शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा होत आहे.
अभिमानाची बाब आहे.या शाळेमध्ये अनेक नामांतर व्यक्तींनी शाळा प्रवेश घेतला आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी यांनी या शाळा प्रवेश दिनाबाबत अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने या शाळेमध्ये शिकणाऱ्या इतर विद्यार्थी व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची माहिती पुढे आलेली आहे. सध्या या हायस्कूलमध्ये शाळा प्रवेश दिनानिमित्त जो कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमाला डहाणू येथील माजी आमदार जे. पी. गावित, आमदार विनोद निकोले, कॉ.उदय नारकर, ॲड.वसंत नलावडे, ॲड.विलास वहागावकर, रेखा कसबे, विजय मांडके, गणेश दुबळे, जयंत उथळे, दिलीप सावंत,शिक्षणाधिकारी शबनम मुजावर,समाजकल्याण उपायुक्त नितीन उबाळे, समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे, प्रा.केशव पवार, नांदेड येथील द्रोपदाबाई कसबे, सन्मित्र देशमाने,अशा अनेक मान्यवरांनी भेट दिली.
दरम्यान ,उठता बसता निवडणुकीच्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नामस्मरण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील व शहरातील एकाही लोकप्रतिनिधीला या शाळा प्रवेश दिनामध्ये सहभागी व्हावे असे वाटले नाही. याचा तीव्र शब्दात वक्ते प्रवीण धस्के यांनी निषेध नोंदवला आहे.
वास्तविक हा निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम नसला तरी फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने ही बाब त्यांनी मांडली त्याचबरोबर या शाळा प्रवेश दिनाचे शिल्पकार सातत्याने ज्यांचा उल्लेख केला जात आहे.
यावेळी ए. के. गायकवाड, भाऊ धाहिंजे, टी एस जाधव,ॲड. विलास वहागावकर, डी टी गायकवाड, ॲड. दयानंद माने, चंद्रकांत खंडाईत, अरुण पोळ,जे. डी. दणाणे, वामनराव मस्के, अरुण जावळे, विजय मांडके अशा अनेक लोकांचा सहभाग होता.
जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही पण जुन्या इतिहासावर आपले नाव कोरून नवीन इतिहास करण्याची आता जी राजकीय प्रथा सुरू झालेले आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे. जे सत्य अंतिम असते त्याला कुठलाही मुलामा अथवा शाब्दिक चल करून भागत नाही. इतिहास कोणीही बदलू शकत नाही अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच जे लोकप्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात पण त्यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. हा निषेध मतपेटीतूनही व्यक्त झाला पाहिजे अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मिलिंद कांबळे,अमोल गंगावणे यांनी स्पष्ट केले.
आज खऱ्या अर्थाने या शाळा प्रवेश दिनानिमित्त आज ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस ‘म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ परिपत्रक काढून सुरु केला. दिनांक ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला होता. या शाळेच्या रजिष्टरला १९९४ या क्रमांकासमोर भिवा म्हणजे बाबासाहेब यांची सही आपल्याला दिसते.बाबासाहेब शाळेत गेले.हा त्यांचा शाळा प्रवेश ते पुढे जगातील एक थोर ज्ञानी व्यक्ती म्हणून झालेला हा प्रवास अचंबित करणारा असाच आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी स्वत:ला अखंड विद्यार्थी म्हणून घेतले आहे. आज या शाळा प्रवेश दिनानिमित्त अनेक मात्तबर मंडळींनी प्रतापसिंह स्कूलला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दाखल्याचे दर्शन घेतले
You must be logged in to post a comment.