सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. राज्य शासनाच्यावतीने ज्या गोष्टींची आवश्यकता त्याची तातडीने पुर्तता करण्याच्या दृष्टीने सुचना केल्या. त्यानंतर आज सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाच्यावतीने १३ रुग्णवाहिका दाखल झाल्या.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १३ रूग्णवाहिकांचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. राज्य शासनाने दिलेल्या या रूग्णवाहिकांचे सातारा येथे वितरण करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या संकट काळात या रूग्णवाहिका उपलब्ध झाल्याने जिल्हातील आरोग्य यंत्रणेसह रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामध्ये बावधन ता.वाई, बामणोली ता.जावळी, सातारारोड ता.कोरेगाव, वाठार स्टेशन ता.कोरेगाव, पुळकोटी ता.माण, मलवडी ता.माण, मसवड ता.माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या. तसेच सर्वसाधारण रूग्णालय सातारा यांच्या अंतर्गत असणाऱ्या जिल्हा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय फलटण, ग्रामीण रुग्णालय मेढा, ग्रामीण रुग्णालय दहिवडी, ग्रामीण रुग्णालय कलेढोण, ग्रामीण रुग्णालय गोंदवले या रूणालयांसाठी रूग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सभापती मानसिंगराव जगदाळे, सदस्य मंगेश धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सुरेंद्र गुदगे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदींची उपस्थिती होती.
You must be logged in to post a comment.