सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेची परवानगी न घेताच इमारत बांधकाम करणाऱ्या अनाधिकृत १३ कॉफी कॅफे सातारा पालिका व सातारा पोलिसांनी सील केले. अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेने कॅफे चालकांना यापूर्वी नोटीस दिली होती.
शहरात अनाधिकृत बांधकामे सुरु असून काही ठिकाणी मंजूर आराखड्यात बदल करुनही इमारती बांधल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. कॉफी कॅफेबद्दल नगरपालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. काही कॅफेमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यास मुभा दिली जाते. कॅफे सुरु करण्याबाबत आवश्यक असलेल्या परवानग्याही घेतल्या जात नाहीत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाने १३ जणांना नोटीस देवून आवश्यक कागदपत्रे व खुलासा मागवला होता. मात्र संबंधितांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय या कॅफेमध्ये तरुण- तरुणींना प्रायव्हसी उपलब्ध करुन दिली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
संबंधितांनी आवश्य परवानगी व कागदपत्रे सादर करावी अन्यथा अनाधिकृत बांधकाम प्रकर गाळे सील करून दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिला. ही कारव ‘शहर नियोजन विभागाचे भाग निरीक्षक सतीश साखरे, प्रकाश शिर्के, श्रीकांत गोडसे, अतिक्रमण हटाव विभाग प्रशांत निकम, सातारा पोलिस दल राहूल खाडे, सुनील कर्णे यांनी केली.
You must be logged in to post a comment.