एसटी कामगारांनी राज्य सरकारचा घातला तेरावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आर्थिक समस्यांमुळे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा या मागण्यांना घेऊन राज्यातील एसटी कामगारांचे सलग तेराव्या दिवशी काम बंद आंदोलन सुरु ठेवले. आज कराड एसटी आगारामध्ये कामगारांनी राज्य सरकारचा निषेध करत तेरावा घातला.

आर्थिक समस्येमुळे एसटी कामगारांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखा आणि राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करा या मुद्दयावरुन आक्रमक झाले व काम बंद आंदोलन केले. त्याला स्थानिक राजकीय पाठिंबाही मिळाला.
विविध मागण्यांसाठी कामगारांकडून केल्या जाणाऱ्या काम बंद आंदोलनाचा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झाले आहे, तेथील स्थानिक एसटी प्रशासनाकडून कायदेशीर कारवाईलाही सुरुवात केली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे एसटी महामंडळाने मान्य केले. मात्र महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावी या मागणीवर एसटी कामगार ठाम असून ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

error: Content is protected !!