सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मारामारी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, हातभट्टी दारु निर्मिती, चोरी, जनावरांची कत्तल आदी गुन्ह्यातील सातारा, फलटण, उंब्रज, शिरवळ येथील रेकॉर्डवरील १५ गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा शहरातील दुचाकी चोरीप्रकरणी प्रल्हाद उर्फ परल्या रमेश पवार (वय १९, रा.केसरकर पेठ, सातारा), विकास मुरलीधर मुळे (वय २०, रा.पावर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा) या टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. फलटण शहरात बेकायदा गाई, म्हैस या जनावारांची कत्तल करणे तसेच बेकायदा वाहतूक करुन त्याची विक्री केल्याप्रकरणी तय्यब आदम कुरेशी (वय ३६), हुसेन बालाजी कुरेशी (वय ४७ ), जमील मेहबूब कुरेशी (वय ४२ ), सद्दाम हसीन कुरेशी (वय २७ ), अरशद जुबेर कुरेशी (वय २५), अमजद नजीर कुरेशी (वय ४१, सर्व रा.फलटण शहर) या टोळीला पूर्ण सातारा जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर मधून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. दरम्यान, फलटण शहरात गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, हातभट्टी दारु निर्मिती प्रकरणी सनी माणिक जाधव (वय २६ ), गणेश महादेवराव तेलखडे (वय ३७, दोघे रा.मलटण ता.फलटण) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तसेच भोर यामधून तडीपार करण्यात आले आहे.
उंब्रज पोलिसांनी जबरी चोरी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राकेश उर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (वय ३२,रा. कदम मळा, उंब्रज), शंकर उर्फ नाना लक्ष्मण शितोळे (वय २९, रा.आंधारवाडी ता. कऱ्हाड ), सोन्य उर्फ अनिकेत आदिक चव्हाण (वय २० रा.आंधारवाडी) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. शिरवळमध्ये गर्दी करुन मारामारी व उद्योजकांमध्ये दहशत तयार करणार्या संजय तुकाराम ढमाळ (वय ५३), योगेश दादासाहेब ढमाळ (वय २९, दोघे रा.केसुर्डी ता.खंडाळा) या टोळीला एक वर्षासाठी सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.